हिंदराष्ट्र संघाच्या उपाध्यक्षा सौ.राधाताई सपकाळ श्री.बाळासाहेब सपकाळ यांनी केला सौ.ज्योतीताई पाटील कु. अॕड.स्नेहल पाटील यांचा सत्कार

केज/प्रतिनिधी
हिंदराष्ट्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. राधाताई सपकाळ व श्री. बाळासाहेब सपकाळ यांनी पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.यावेळी अॅड.स्नेहल पाटील यांनी ऑल इंडिया बार एक्झामिनेशन यशस्वी रित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कायद्याच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच सौ.ज्योतीताई पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई केज तालुका महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिता साठी भरीव कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या सदिच्छा भेट व सत्कार प्रसंगी सामाजिक, कायदे विषयक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
केकतसारणी या गावचे सपकाळ व पाटील परिवार भुमीपुत्र आहेत .त्यामुळे केकतसारणी गावकऱ्यांच्या वतीने केलेला सत्कार अमुल्य आहे. अशी प्रतिक्रिया सत्कार मुर्ती यांनी व्यक्त केली .या छोटे खानी कार्यक्रमामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.पाटील परिवाराच्या वतीने सपकाळ परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.



