सामाजिक

आडस येथील योगेश्वरी मंगल कार्यालयात अॕड. आकाश आणि डॉ. रोहिणी यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न, विवाह सोहळ्याला मान्यवरांनी दिले शुभाशिर्वाद 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील लाड परिवाराचे चिरंजीव तथा अंबा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक केज वकील संघाचे अध्यक्ष ॲड.महादेवराव लाड आबा यांचे नातु चि.अॕड. आकाश लाड व आणि आसोला ता.किल्ले धारूर येथील चोले परिवाराची सुकन्या चि.सौ. कां.डॉ.रोहिणी यांचा शुभविवाह सोहळा रविवार,दि.२६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.अंबाजोगाई रोड वरील योगेश्वरी मंगल कार्यालय आडस येथे हा विवाह सोहळा पार पडला.या सोहळ्यासाठी राजकीय,सामाजिक, विधी आणि वैद्यकीय,व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

अॕड.आकाश हे विधी शाखेचे पदवीधर असून ते लाडे वडगाव येथील प्रतिष्ठित लाड परिवाराचे सदस्य आहेत. तर वधू रोहिणी या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असून धारूर तालुक्यातील आसोला येथील चोले परिवारातील आहेत. वकिली आणि वैद्यकीय अशा दोन महत्त्वाच्या क्षेत्रांतील उच्चशिक्षित वधू-वरांचा हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

विवाहापूर्वी शनिवारी सायंकाळी ‘हळदीचा समारंभ’ उत्साहात पार पडला.रविवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मंगल वाद्यांच्या गजरात आणि मंगलमय वातावरणात वधुवर यांच्यावर शुभाशिर्वाद रुपी अक्षता पडल्या. यावेळी समस्त लाड परिवार आणि चोले परिवाराने आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले.या विवाह सोहळ्यानिमित्त दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नांदा सौख्यभरे” अशा शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांनी वधू-वरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या मंगल सोहळ्याला न्यायाधीश श्री.सुरज केंद्रे,खा.बजरंग सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे,मा.आ. सौ.संगिताताई ठोंबरे, अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, माजी चेअरमन अॕड.राजेसाहेब देशमुख,अंबाजोगाई चे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा,भाजपाचे संतोष हांगे,विष्णु भाऊ घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृष्णा अर्बन बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे,मुरली बप्पा ढाकणे. शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे,मनसे जिल्हाप्रमुख सुमंत धस,केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, गटनेते श्री.हारुणभाई इनामदार, डॉ.अशोक थोरात,अंबाजोगाई येथील नगरसेवक बबनराव लोमटे यांच्या सह राजकीय,शैक्षणिक सामाजिक, विधीज्ञ, कला, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरुची भोजनानंतर विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!