सामाजिक

केज तालुका जनगणना प्रशिक्षणाची नियोजन बद्ध सुरुवात,दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशिक्षण स्थळी भेट; प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन

केज/प्रतिनिधी

आगामी जनगणना २०२७ प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणाला वेग आला असून दि. २५ एप्रिल रोजी आयोजित प्रशिक्षण सत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली व प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन केले.जीवन शिक्षण विद्यालयात जनगणना प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला याचा समारोप शनिवार रोजी संपन्न झाला.यावेळी दिल्ली येथून आलेले पथक प्रमुख गृहमंत्रालय भारत सरकार प्रतिनिधी असीम तालुकेदार,अनुज गोठी,बीड जिल्हा समन्वयक आशिष शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक तहसीलदार 

अशोक भंडारे,नायब तहसीलदार विकास हजारे,जनगणना लिपिक शुभम राऊत,जनगणना ऑपरेटर कामेश वाघमारे यांच्या नियोजनाखाली प्रशिक्षण पूर्ण होत आहे.प्रशिक्षणाची प्रगती तपासली.यावेळी त्यांनी वर्गात प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षणाची पद्धत,विषय मांडणी व प्रात्यक्षिके यांचा आढावा घेतला.

प्रशिक्षण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू

एकूण चार बॅचमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण होत आहे ग्रामीण एकूण प्रगणक ४२७ एकूण सुपरवायझर ७० एकूण फिल ट्रेनर ६ याप्रमाणे नियोजन केले जात आहे.प्रगणक व पर्यवेक्षक एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकत आहेत. डिजिटल सादरीकरण, फळ्यावरचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणार्थीनीही विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला मार्गदर्शन करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्याविकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी समजून अचूक व पारदर्शक माहिती संकलित करावी. नागरिकांशी विश्वासपूर्वक संवाद साधणे ही यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली आहे.सर्वांनी या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!