जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न,आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी सक्रीय राहावे- प्राचार्य दामोधर थोरात

केज/प्रतिनिधी
जेष्ठ नागरिक संघ केज जि.बीड चा वर्धापन दिन १८ एप्रिल २०२६ रोजी केज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी फेस कॉम दक्षिण विभागाचे अध्यक्ष प्राचार्य दामोधर थोरात यांनी उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की,जेष्ठ नागरिकांनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी सक्रीय राहावे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज तालुका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय राजेसाहेब देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केज च्या जेष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री.गदळे जी.बी.यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघाचे सहसचिव श्री.साखरे डी. एस.यांनी केले.जेष्ठ नागरिक संघाचे श्री. जाधव एल.ए.यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला लातूर येथील माजी सचिव प्राध्यापक प्रभाकर कापसे,बीड जिल्ह्याचे समन्वयक श्री.मामडगे जे.डी,अंबाजोगाई जेष्ठ नागरी संघाचे अध्यक्ष अनंतराव जगतकर, तसेच माजलगाव जेष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री कांतराव गाजरे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केज तालुका जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष श्री.रामेश्वर जाजू यांनी सहकार्य केले.स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मंगळवार पेठ केज येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली आणि सुरुची भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.



