
केज/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून,पुस्तकांशी मैत्री करत सातत्यपूर्णअभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. हनुमान सौदागर यांनी केले.ते सरस्वती महाविद्यालय, केज अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा तर्फे आयोजित यशस्वी विद्यार्थी गौरव सोहळ्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य डॉ. किरणकुमार धिमधिमे होते.तर सत्कारमूर्ती म्हणूनमहाविद्यालयातील विद्यार्थिनी रूपाली चांगदेव नेहरकर हिची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते तिला वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले.पुढे बोलताना डॉ.सौदागर म्हणाले की, वाचनातून ज्ञानप्राप्ती होते.पुस्तके माणसाला जगायला शिकवतात असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात उप प्राचार्य डॉ.धिमधिमे यांनी विद्यार्थ्यांना या यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन जीवनात पुढे जाण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना रूपाली नेहरकर हिने अपयशा नंतरही खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,असा आत्मविश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष मस्के यांनी केले. प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.नागेश कराळे यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रमेश माने यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



