सामाजिक

एनसीआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा चुकीचा,खा.बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र; नकाशात बदल करून ऐतिहासिक सत्याची मोडतोड थांबवण्याची मागणी

बीड/प्रतिनिधी

एनसीआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशात करण्यात आलेले बदल अत्यंत गंभीर असून,हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि देशाच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान आहे.हा चुकीचा नकाशा तात्काळ दुरुस्त करून ऐतिहासिकदृष्ट्या अचूक नकाशा प्रसिद्ध करावा, अशी मागणी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहले आहे.

खा.सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य हा भारतीय इतिहासातील एक सुवर्णकाळ आहे. पेशव्यांच्या काळात या साम्राज्याचा विस्तार भारतीय उपखंडातील विस्तीर्ण भागापर्यंत झाला होता.अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास जगजाहीर आहे. मात्र, एनसीआरटी च्या नवीन पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि प्रभाव अत्यंत कमी करून दाखवण्यात आला आहे. हा प्रकार इतिहासाची मोडतोड करणारा आणि सत्याचा अपलाप करणारा आहे.

इतिहासाच्या पुस्तका तील या चुकीच्या बदलामुळे महाराष्ट्र राज्यात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करून नव्या पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडला जात असल्याची भावना जन सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.या विषयावर राज्यभरातून संतापव्यक्त होत असतानाच खा. सोनवणे यांनी थेट केंद्राकडे धाव घेत या प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडले आहे.एनसीआरटीने या नकाशात बदल का केला,याचे अधिकृत आणि स्पष्टीकरण सरकारने द्यावे, ऐतिहासिक दृष्ट्या योग्य आणि प्रमाणिक नकाशा पुन्हा पुस्तकात समाविष्ट करण्यात यावा,मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास कमीलेखण्याचा प्रयत्न थांबवावा आदि मागण्याही करण्यात आल्या आहेत.

००

मराठा साम्राज्याचा विस्तार हा केवळ भौगोलिक नव्हता,तर तो आमच्या अस्मितेचा विषय आहे.एनसीआरटी सारख्या जबाबदार संस्थेने चुकीचा नकाशा देऊन इतिहासाशी अन्याय करू नये.शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अन्यथा हा विषय अधिक तीव्रतेने मांडला जाईल असा इशारा खा.बजरंग सोनवणे,लोकसभा सदस्य,बीड यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!