वैद्यकीयसामाजिक

आयुष्यमान आरोग्य मंदिर सारणी (आ) येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न,ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर संपन्न 

केज/प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्र, युसूफवडगाव अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर,सारणी(आ) व ग्रामपंचायत सारणी (आ) यांच्या संयुक्त विद्यमानाने NCD (असंसर्गजन्य रोग) कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

या शिबिरा मध्ये करण्यात आलेल्या तपासण्यमध्ये रक्तदाब, मधुमेह/रक्तातील साखर तपासणी,कर्करोग तपासणी,ईसीजी तपासणी,हिमोग्लोबीन सह सर्व आजारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.हे शिबीर आयोजित करण्यासाठी केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लोमटे सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सारूक सर,डॉ.नागरे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबीर सारणी (आ) येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा सुर्यवंशी,आरोग्य सेवक आनंद घोडके,लॅब टेक्निशियन प्रितम बचुटे, आरोग्य सेविका रंजना दोडतले,आशाताई रोहिणी खरात,वनमाला सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!