सामाजिक

बीड जिल्ह्यात आम्रमच्या देवगड हापूस व्यवसायाची भरभराट

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आम्रमच्या देवगड हापूस आंब्याच्या व्यवसायाने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.विशेषतः अंबाजोगाई शहरात या व्यवसायाची मजबूत पायाभरणी झाली असून, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्या मुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे.मागील सहा वर्षां च्या कालावधीत या व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच ग्राहकांपर्यंत पोहोंचण्या साठी व त्यांना जोडण्या साठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

या उपक्रमात अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष श्री. नंदकिशोरजी मुंदडा,केज मार्केट कमेटी सभापती श्री.अंकुशरावजी इंगळे, सौ.स्वरूपाताई कुलकर्णी,धनराजजी सोळंकी,प्रेरणा ड्रेसेस परिवार,भास्कर भिसे, तळणीकर साहेब, फुलचंद भाऊ जाधव, भरतजी तोष्णीवाल, तसेच केज येथील प्रतिष्ठित नागरिक भैय्यासाहेब देशमुख व गिरीराज कलेक्शनचे मालक पिलाजी परिवार यांसह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.या सर्वांच्या योगदानामुळे देवगड हापूस आंब्याची ओळख बीड जिल्ह्यात अधिक दृढ झाली असून, भविष्यातही या व्यवसायाचा विस्तार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या टीमच्या संबंधितांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले असून,पुढेही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!