जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी पुर्णत्वास


केज/प्रतिनिधी
केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे वर्ष हे पत्रकारिता क्षेत्रात काम केले त्यांनी अनेक चढउतार या पत्रकारितेत बघितले आहेत.१९९२ साली त्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली.तो काळ आणि आजचा काळ यात जमीन आस्मानाचा फरक आहे कारण त्यावेळेस प्रत्यक्ष बातमी लिहायला लागायची व घटनास्थळी जाऊन माहिती घ्यावी लागायची.ती बातमी लिहून ते पाकीट वाहका जवळ द्यायचे व बातमी छापून यायची वाट बघायची.
त्यांनी अनेक पत्रकार घडविले.त्यांनी विवेक सिंधु,अजिंठा, गावकरी, चंपावती पत्र, सर्वसाक्षी,देवगिरी तरुण भारत, सोलापूर तरुण भारत,अशा अनेक वर्तमानपत्रातून काम करून त्यांनी पत्रकारितेचा प्रवास आज पर्यंत जपला आहे. आज ते स्वतःचे साप्ताहिक केज परिसर १४ वर्षापासून सांभाळतात व केज तालुक्यात प्रथम अधिस्वीकृतीधारक पत्रकार होण्याचा मान त्यांनाच मिळाला पण कधीही त्याचा त्यांनी गर्व केला नाही.आजही त्यांच्या विनम्र स्वभाव व हसतमुख चेहरा पाहून त्यांच्याकडून आणि गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. १९९५ ला युवा पत्रकार संघटना स्थापन केली.त्यानंतर त्यांनी जनतेसाठी व शेतकरी असो शैक्षणिक असो अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.आज वयाची साठ वर्ष पूर्ण झाली असे त्यांच्याकडे बघून वाटत नाही.
पत्रकारितेतील अनेक किस्से ते सांगताना म्हणतात की, लिफाफा पासून एक रुपयाच्या कॉइंन बॉक्स, फॅक्स,टेलिफोन ई-मेल ते आजच्या अँड्रॉइडफोन पर्यंत त्यांनी अनुभव घेतलेला आहे.त्यांच्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्या उर्वरीत आयुष्याला समृद्धी लाभो व पत्रकारितेची सेवा अजूनही त्यांच्या हातून घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.पत्रकार, संपादक श्री.सतीश केजकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या खुप खुप शुभेच्छा आपल्या हातातुन अशीच समाज सेवा घडावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.



