अकोला येथे युवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला शिखर पुरस्कार सौ.दिपाली संतोष काटे प्रदान

केज/प्रतिनिधी
केज येथील रामकृष्ण परिवाराच्या साधक सौ. दिपालीताई संतोष काटे यांना अकोला येथे युवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला शिखर पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या बाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला येथे सामाजिक, शैक्षणिक,अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अकोला येथील ‘युवा विचारपीठ प्रतिष्ठान’च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६’ सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.
स्त्रीच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान व्हावा, याउदात्त हेतूने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या ५५ कर्तृत्ववान महिला आणि १५ सामाजिक महिला संस्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.या सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. बी.चंद्रकांत रेड्डी अप्पर पोलीसअधीक्षक, अकोलामा.सौ.शारदाताई खेडकर महापौर,अकोला मा.सुरेशराव देवकर संस्थापक अध्यक्ष,अदिती अर्बन, मा.संजयजी रूहाटिया संचालक, कालुराम फूड,मा.सौ. मालतीताई कायटे पोलीस निरीक्षक,मा. प्राचार्य रामेश्वरजी भिसे श्री शिवाजी कॉलेज,मा. प्रा.प्रकाश डवले,मा. कुणाल ढोमणे व्यवस्थापक,पी एन जी ज्वेलर्स,मा.सौ.त्रिवेणी ताई कुणाल घोलप आरटीओ अधिकारी,मा. सौ.अर्चनाताई शर्मा समाजसेविका,मा.सौ. रश्मीताई दीपक खडसान, मा.सौ . ऋतुंबराताई धोत्रे मानसशास्त्रज्ञ,डॉ.प्रवीण अग्रवाल, श्री.सुभाष शेगोकार अधिकारी, सेंट्रल रेल्वे आणि श्री. मनोज देशमुख सर यांची उपस्थिती होती.सौ. दिपालीताई संतोष काटे यांनी कुठलेही प्रशिक्षण न घेता भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या ग्रंथा विषयी विवेचन करीत आहेत.
त्या प्रवचनकार तसेच ज्ञानेश्वरी अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार करीत आहेत. प.पु.वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या सान्निध्यात त्यांनी अध्ययन केले आहे.प्रत्येक व्याख्यानात विविध प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रंथावर आपल्या मधुर वाणीमधुन व्याख्यान देत आहेत याबद्दल विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.त्यांना ‘राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६’ पुरस्कार मिळाल्याबद्दल रामकृष्ण परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.



