सामाजिक

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात ; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह ! संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात

केज/प्रतिनिधी

केज शहरातील कानडी रोडचे काम नगरोथ्थान योजने अंतर्गत पूर्ण करण्यात आले असले तरी या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत.विशेषतः प्रशांत नगर परिसरात रस्त्या वरून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर कोणताही संरक्षणात्मक कठडा बांधण्यात आलेला नाही. यामुळे नागरिक,पादचारी तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या मार्गावर जवळच मोठी शाळा असून सतत रहदारी असते.पुढे अनेक गावांकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे दिवसभर वर्दळ असते.मात्र नाल्यावर कठडा नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद केज यांच्या संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे झाले,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला लाभ मिळावा म्हणून जाणूनबुजून या त्रुटीकडे दुर्लक्ष केले जात आहे का,अशीही चर्चा सुरू आहे.दरम्यान, कानडी रोडवरील कामातील त्रुटी तात्काळ दूर करून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी संविधान एकता युवा मंच,कानडी रोड केज लवकरच आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!