
केज/प्रतिनिधी
दि.९ डिसेंबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने जिल्हाक्रीडा संकुल बीड येथे शालेय सॉफ्टबॉल १४वर्ष वयोगट विभागीय स्पर्धा दिनांक ९ डिसेंबर २०२५रोजी क्रीडा संकुल बीड येथे संपन्न झाल्या.यात बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी विद्यालयाचा १४ वर्ष मुलांचा व मुलींचा संघ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सहभागी झालेला होता.या स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरा साठी पात्र झाला आहे. तसेच मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या संघास क्रीडा मार्गदर्शिका तथा प्राचार्य डॉ.कविता गीते मॅडम,क्रीडा शिक्षक सानप सर,कांदे मॅडम, घुले सर,साखरे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते. तसेच माजी विद्यार्थी केशव कराड व सीनियर खेळाडू कृष्णा गिते या विद्यार्थ्यांनी नियमित सराव घेऊन विद्यार्थ्यांना राज्यस्तरांपर्यंत पोंहोचण्यास मदत केलेली आहे.या विद्यार्थ्यांचे बीड जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर सर,दिनकर थोरात सर, रेवन्नाथ शेलार सर,सतीश राठोड सर अनिकेत काळे सर, होसुरकर सर,संस्था अध्यक्ष ॲड.उद्धवराव कराड साहेब, कापसे सर सर्व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या आहेत.


