द इंडियन रोड काँग्रेस मानकांविरुद्ध असणारे केज बीड रोडवरील गतिरोधक तात्काळ हटवावेत -डॉ अजय कदम

केज/प्रतिनिधी
रस्त्यावरील वाहने ही खूपच वेगाने धावत आहेत.काही तरुण, महिला बेदरकारपणे वाहने चालवत आहेत. काही चालक नशेच्या अधीन राहून वाहन चालवतात.या आणि अशा अनेक कारणांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत.मानवी जीवन अमूल्य आहे.रस्त्यावर अपघात होतो ते दृश्य आणि मिळणारी मदत पाहिल्यावर कठोरातल्या कठोर मनुष्याचे ह्रदय पिळवटून जाते आणि मुखातून एक वाक्य बाहेर पडते इथे गतिरोधक हवाच यात गैर ते काय ? सामान्य माणसाचा जीव आणि कुण्या महान नेत्याचा जीव सर्वत्र सारखाच असतो.तरीही, गतिरोधक उभारणी केल्यावर हे अपघात होणार नाहीत याची हमी देता येत नाही.
गतिरोधक उभारणीचे काही नियम आहेत.कुणीही उठसुठ हे गतिरोधक उभारणी करू शकत नाही.The Indian road Congress ही संस्था १९९६ साली स्थापन झाली असून, संस्थेने यासंबधीची नियमावली तयार केली आहे.या नियमांना वगळून आपण हवे तेव्हा आणि वाटेल तिथे गतिरोधक उभारू शकत नाही.या संबधी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फार महत्वाचा वाटतो.दि.३० मे २०१६ रोजी ‘द हिंदू’ या दैनिकात आलेली बातमी यावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहे.
कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेत निर्णय देतेवेळी न्यायमूर्ती बी.डी. अहमद व न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांनी “ The Indian road Congress aani Unified Traffic and Transportation center” यांनी निर्धारित केलेल्या मानकांच्या विरुद्ध असलेले सर्व गतिरोधक चार आठवड्यात काढून टाकण्यात यावेत”असा आदेश दिला.याचा अर्थ असा की,राष्ट्रीय महामार्गा वर गतीरोधक उभारता येणार नाहीत.ते राज्य मार्गावर,चौकात,शहरी भागात,शाळा,दवाखाने अशा ठिकाणी उभारता येतात.
मात्रते महामार्गावर उभारता येत नाहीत.उंची चार इंच असावी.४० मीटर अगोदर काळ्या – पांढऱ्या रंगाच्या चमकदार प्रवर्तित खुणा असाव्यात. राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी हा तळेगाव दाभाडे ते अहमदपूर ३९२ किमी. लांबीचा आहे.या अंतरा मध्ये येणाऱ्या रस्त्यावर वस्त्या,गांवे, खेडे, शाळा, महाविद्यालये,दवाखाने, कडेलाच बाजारपेठा आहेत. यामुळे साहजिकच रस्त्याच्या कडेला मनुष्यांची रहदारी होते. अगदी रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी केली जातात. दुकानाच्या पाट्या लावल्या जातात.नाल्या खोदल्या जातात.
रस्त्याच्या शेजारी काही पेठांमध्ये तर आठवडी बाजार भरतो.रस्त्याच्या कडेला काही दादा लोक आपली वाहने उभी करतात त्यामुळे कितीतरी तास वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. कधीकधी अपघात होतात आणि या सर्वांचा राग निघतो तो निर्जीव रस्त्यावर.तो बिचारा काही प्रतिक्रया देत नाही. यामुळेच की काय आपण वाटेल तिथे गतिरोधक उभारतो.हे नव्याने उभारलेले गतिरोधक स्थानिकांना थोडाफार दिलासा देतात.
हे कार्य ज्यांनी केले त्यांनाही दैनिकात स्थान मिळते. मात्र, अपघाताचा प्रश्न कायमचा संपला असे कोणीच सांगू शकत नाही. मराठीत एक म्हण आहे “ दुखणे हल्याला असते आणि इंजेक्शन आपण पखालीला देतो” यांनी याचेही कौतुक होते ही आश्चर्याची बाब हल्ली घडताना दिसत आहे.या सर्व बाबींचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की सरकारी यंत्रणा आणि बेशिस्त नागरिक यांच्या मुळे हे अपघात होत आहेत.
यासंबधी या सरकारी यंत्रणांना प्रश्न विचारायचे सोडून आपण निर्जीव रस्त्यावर अन्याय करतो.वाटेल तिथे रोड फोडणे, कडेला जनावरे बांधणे,गतिरोधक उभारणे खरोखरच थांबविले पाहिजे.अशा आशयाचे निवेदन डॉ.अजय कदम तालुका प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प),व अक्षय मुजमुले यांनी दिले आहे.



