केज पोलीस ठाण्याच्या परिसरात गोंधळ घातला चौघांविरुद्ध गून्हा दाखल

केज/प्रतिनिधी
केज येथील पोलीस ठाण्याच्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून एकमेकांना झोंबाझोंबी केल्या प्रकरणी चौघां विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.
मंगळवार दि.२४ मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान केज पोलीस ठाण्याच्या आवारातील सार्वजनिक ठिकाणी चौघांनी आपापसात हाणामारी करून,झोंबझोंबी करून, मोठमोठ्याने आरडा ओरडा करून शांततेचा भंग केल्या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादी वरुन जुनेद शाकेर शेख वय ३६ वर्ष,मुसीब शाकेर शेख,वय २६ वर्ष दोघेही रा.खाजानगर, केज, साईद शाकेर शेख,वय ३८ वर्ष सलाबेल अपार्टमेंट,मुंबई व सलाउद्दीन नबाब काझी, वय ३८ सुलतान चौक, केज या चौघांनी केज पोलीस ठाण्याच्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी एकमेकांत हाणामारी,झोंबाझोंबी करून,व आरडा ओरड करून शांततेचा भंग केला,म्हणुन केज पोलिसात गून्हा दाखल झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उप निरीक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.



