आपापल्या परिसरातील भोंदूं महाराज यांची तक्रारीसह माहिती द्यावी – हनुमंत भोसले

केज/प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे डोळे उघडले आहेत. ज्योतिषी सारख्या थोतांड गोष्टीचा वापर करून एक अशिक्षित व्यक्ती स्वतःला उच्य शिक्षित समजणाऱ्या लोकांना आर्थिक,लैंगिक व मानसिक शोषण करून कसे सहज फसवतात हे जगाने पाहिले आहे.
आज फक्त भोंदू अशोक खरात चर्चेत असला तरी या क्षेत्रात अध्यात्माचा आड पकडून यापेक्षाही मोठे भोंदू आज ही समाजात उजळ माथ्याने मिरवत आहेत.याशिवाय गाव, तालुका व जिल्हा पातळी वर असे अनेक छोटे मोठे भोंदू सक्रिय आहेत.हे लोक त्या त्या पातळीवर भोंदू अशोक खरात इतकेच समाजाला धोकेदायक आहेत. आपापल्या पातळीवर हे भोंदू लोक वरील सर्व प्रकारचे शोषण करत आहेत.अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी सारख्या संघटना व कार्यकर्ते अशा लोकांना समाजापुढे त्यांचे पितळ उघडे पाडतात तेंव्हा समाजा तीलच कांही लोक त्यांचे समर्थन करून त्यांना संरक्षण देतात.त्यामुळे अशा लोकांवर कार्यवाही करणे अवघड जाते.अशा भोंदू चे भक्त ग्राहक शक्य तो गावाबाहेरचे ऐकीव माहितीवरून शक्यतो दूरच्या गावाहून आलेले असतात.
अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास होतो.तरीही स्थानिक संबंधामुळे ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी त्याचे नांव,पत्ता,भोंदूगिरी साठी वापरत असलेल्या लिंबू,नारळ,मिरच्या, हळदी – कुंकू यासारखे साहित्य व ही कृती करतानाचा किमान एखादा व्हिडीओसह कोणीतरी तक्रार करणे गरजेचे आहे.वरील माहितीसह जर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली तर समिती अशा लोकांवर पोलिसांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करू शकते अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले आहे.
सध्या बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कांही गावात भोंदू अशोक खरात याच्याप्रमाणेच लोकांच्या समस्या सोडवण्याच्यानावाखाली त्या पातळीवर लैंगिक, आर्थिक व मानसिक शोषण करत असल्याची माहिती बीड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे असून समिती या भोंदू लोकांवर लक्ष ठेवून आहे. आवश्यक ठिकाणी स्थानिक नागरिक व आजपर्यंत फसवणूक झालेल्या लोकांच्या तक्रार अर्ज मिळताच समिती त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करणार आहे.यासाठी जनतेने 9423733888 या व्हाट्सअप क्रमांका वर माहिती व तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हनुमंत भोसले व कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.



