शैक्षणिक

भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केजला प्रशासकीय तपासणीत C+ ग्रेड प्राप्त

केज/प्रतिनिधी

भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज येथे अलीकडेच प्रशासकीय अंकेक्षण समितीमार्फत तपासणी पार पडली.या तपासणीत महाविद्यालयास C+ ग्रेड प्राप्त झाला असून, संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

या यशाबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (बीड) जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रविणकुमार शेप तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.प्रताप मोरे सर यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर व सुजीत नाईकवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.  महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य, पारदर्शक प्रशासन आणि शिस्तबद्ध कार्य पद्धतीमुळे हे यश मिळाल्याचे प्रशासकीय अधिकारी श्री.प्रतापराव मोरे सर यांनी सांगितले.

भविष्यात महाविद्यालयाला अधिक उच्च श्रेणी मिळवण्या साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन ही करण्यात आले.या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग,कर्मचारी,विद्यार्थी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.संस्थेच्या या यशामुळे केज तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!