प्रशासकीय

बेपत्ता मुलींचा उत्तम रित्या तपास केला केजच्या पथकाचा एसपीकडून सन्मान 

केज/प्रतिनिधी

केज पोलिस उप विभागा तुन बेपत्ता झालेल्या विविध तक्रारीतील बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांचा उत्तमरित्या तपास केल्याबद्दल केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक व महिला पोलीस अशा कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रशस्तीपत्र देऊन सोमवार दि.२३ मार्च रोजी त्यांचा सन्मान केला.केज पोलिस उपविभागात येत असलेल्या केज,धारूर, युसुफवडगाव व नेकनुर या चार पोलिस ठाण्यात या महिन्यात तब्बल २० महिला व मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

त्या बेपत्ता प्रकरणातील वीस मुलींचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुकुमार बनसोडे व महिला पोलीस नाईक नीता सुर्वे यांनी करून त्यांचा शोध घेऊन बेपत्ता महिला आणि मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले होते.

या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सोमवार दि.२३ मार्च रोजी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे,महिला पोलीस नाईक नीता सुर्वे यांचा प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके,बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!