सामाजिक

केज-सोनीजवळा- आनंदगाव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेनेचे प्रशासनाला निवेदन ; आंदोलनाचा इशारा

केज/प्रतिनिधी

केज-सोनीजवळा- आनंदगाव या मुख्य रस्त्याची गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली असून,वाहन धारकांना व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्या साठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

रस्त्याची बिकट अवस्था

केज-सोनीजवळा आणि आनंदगावला जोडणारा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला आहे.रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थी,शेतकरी आणि रुग्णांना ने-आण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेने तर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील,विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,शहर प्रमुख आकाश चाळक, ज्येष्ठ नेते प्रकाश गुंड, शेख असिफोदिन,बबलू चाळक यांसह इतर शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाला इशारा

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती सुरू करावी.जर येत्या काही दिवसांत सकारात्मक पावले उचलली नाहीत,तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!