महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आज समाजभूषण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार व महासभेचे नंदकुमार गादेवार यांची राहणार विशेष उपस्थिती

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र आर्य भविष्य महासभा बीड जिल्ह्याच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा अर्थातच समाज भूषण पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्याचे आयोजन बीड येथे आज दिनांक २१जुन रोजी करण्यात आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत महाजन व सचिव अजय रुद्रवार यांनी दिली आहे.
बीड येथील हॉटेल नीलकमल या ठिकाणी आज दि.२१ वार रविवार रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची उपस्थिती राहणार आहे तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तसेच मणिपाल हॉस्पिटल पुणे येथील डॉ.प्रसाद बिवरे हे विशेष मार्गदर्शक म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच माधुरीताई कोले, डॉ.सूर्यकांत शिरपेवार, सदानंद मेडेवार,अनिल मनाठकर,प्रदीप कोकडवार,दीपक निलावार,सुमित रुद्रवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी नागपूर येथील जेष्ठ समाजसेवक भाऊराव सिताराम पंत बीरेवार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने तर परळी येथील सौ.सुनीता दिक्कतवार यांचा बीड जिल्हा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे तरी या सोहळ्यास जिल्ह्यातील आर्य वैश्य समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महासभेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन, सचिव अजय रुद्रवार,कोषाध्यक्ष बालाजी बासटवार व कार्याध्यक्ष वैभव झरकर यांनी केले आहे.



