देगलूरच्या भूमिपुत्राला तेलंगणात मानाचे पद ; गजानन बिडकर यांची राज्याध्यक्षपदी निवड

देगलूर/प्रतिनिधी
देगलूर येथील भूमिपुत्र गजानन गंगाधर बिडकर यांची पुरोगामी पत्रकार संघ (भारत)यांच्या वतीने तेलंगणा राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे देगलूर शहरासह परिसरात आनंदाची लाट पसरली असून स्थानिक नागरिकांनी अभिमान व्यक्त केला आहे.या निवडीच्या पार्श्वभूमीवर देगलूर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठित व्यापारी राजेश काप्रतवार तसेच राष्ट्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.इर्शाद पटेल यांच्या हस्ते गजानन बिडकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गिरीश जिल्हेवार,वसंत सुगावे, पत्रकार मारुती कुडकेवार,पत्रकार शशिकांत पटणे,गिरीश बिडकर,गौरव बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.गजानन बिडकर यांची ही निवड संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वातून संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.विशेष म्हणजे, गजानन बिडकर यांचा वाढदिवस देखील याच दिवशी असल्याने दुहेरी आनंदाचा योग साधला गेला.या निमित्त त्यांना व्हॉट्सअॅप,फेसबुक तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक संपर्काद्वारे अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
देगलूरच्या भूमिपुत्राला तेलंगणा राज्यात असे मानाचे पद मिळाल्यामुळे देगलूर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढीलकार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



