सामाजिक

जल है तो कल है नही तो जिंदगी बेहाल है – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड. 

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजानिक वाचनालय,आनंदगांव ता.केज.जि.बीड येथे जागतिक जलदिन, व्याख्यान,भाषण स्पर्धा व गीतगायन स्पर्धा घेवून जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड पाण्याचे महत्व,गरज, आवश्यकता, जपून वापर करणे, काटकसरीने वापरणे, पाण्याची जपणूक करणे, पाणी वाया जाणार नाही याची प्रत्येक नागरीकाने काळजी घेणे,अगदी पिण्याचे पाणी, सांडपाणी, कपडे धुण्यासठी लागणारे पाणी,भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी,अगदी शेतीसाठी लागणारे पाणी याचाही जपूण वापर करणे आवश्यक आहे.अगदी माणसाच्या शरीरात सुद्धा ७०% पाणी आहे याचा अर्थ जल हे जीवन आहे,आणि जीवन हे अनमोल आहे म्हणूनच जल है तो कल है,नही तो जिंदगी बेहाल है असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी व्याख्यान प्रसंगी मत व्यक्त केले.

विहीर पुनर्भरण,बोअरवेल पुनर्भरण,तलाव खोलीकरण,नदी खोलीकरण व नदी रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.माती आडवा, पाणी जिरवा हि मोहिम, तसेच जमिनीच्या माथ्या पासून पायथ्यापर्यंत विविध उपचार करणे आवश्यक आहे,जसे की, सलग समतल चर, जलशोषक चर,मातीचे बांध,दगडी बांध,मातीचे बंधारे,दगडी बंधारे, जाळीचे बंधारे,शेततळे हे उपचार आहेत,जे जमिनी वर केले पाहिजेत,जेणे करून पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत मुरेल व जमिनीची उत्पादकता वाढवेल तसेच पाणी साठा वाढेल,पाणी पातळी वाढेल व पाण्याची वाणवा जाणवणार नाही, हे करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरीकाची असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी.

तसेच अगदी घरावर,छतावरपडणाऱ्या पाण्याचेही उपाययोजना केली पाहिजे व पाणी साठवणूक आणि जपणूक केली पाहिजे तरच उद्या आपला आहे काहीही,कधीही,कशी वेळ येईल सांगता येत नाही.भुतलावर मनुष्यच शहाणा प्राणी आहे,तोच करू शकतो,स्वतः साठी तरी हे सर्व केले पाहिजे यातच आपले भविष्य आहे या जाणिवेतून प्रत्येक व्यक्तीने जगावे, वागावे असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

त्यानंतर याच विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थांनी आपले मनोगते व्यक्त केली.या स्पर्धत प्रथम – शिवतेज गायकवाड,द्वितीय – यशवंत सौदागर,तृतीय – वेदिका डिगांबर गायकवाड हे विजयी झाले.डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपत्र व प्रमणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.तसेच याच विषया वर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत प्रथम – वेदिका गायकवाड, द्वितीय यशवंत सौदागर,तृतीय – समर्थ गायकवाड हे विजयी झाले.या विजयी स्पर्धकांनाही सन्मानपत्र व प्रमाणपत्र देवून डाँ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.व्याख्यान कार्यक्रमात युवक, शेतकरी,जेष्ठ नागरीक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.तर भाषण स्पर्धा व गीतगायन स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थीनी सहभागी होते.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!