सामाजिक

राज्यसभेच्या सिंहासना वर खा.रजनीताई पाटील विराजमान, महाराष्ट्राचा गौरव 

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या जेष्ठ नेत्या खा.रजनीताई पाटील यांना काल राज्यसभेत पिठासिन अधिकारी म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला. दिवसभराचे संपुर्ण कामकाज त्यांच्या नियंत्रणात पार पडले.

पिठासिन अधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले.याच सभागृहात काहीवर्षापुर्वी खा.रजनीताईं पाटील यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.अर्थात ही कारवाई काही दिवसातच रद्द करण्यात आली होती.मात्र काल रजनीताईंचा राजयोग पहायला मिळाला. राज्यसभेतील सर्वोच्च अशा सिंहासनावर विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. अशा संधीचे सोने करत त्यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

राज्यसभेतील पिठासीन अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असते.या पदामुळेच सभागृहातील कामकाज सुरळीत, नियमबद्ध आणि निष्पक्ष पद्धतीने चालते. राज्यसभेचे स्थायी भारताचे उपराष्ट्रपती (हे राज्यसभेचे सभापती असतात) त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती किंवा इतर नियुक्त सदस्य पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतात.

या पदावरील व्यक्ती सभागृहाचे संचालन चर्चा,प्रश्नोत्तर, विधेयके यांचे नियोजन करत असतात.सदस्यां मध्ये शिस्त राखणे, गोंधळ झाल्यास कारवाई करणे,कार्यपद्धती व नियमांचे योग्य पालन होईल याची खात्री करणे मतदानात बरोबरी झाल्यास निर्णायक मत देणे,निष्पक्षता राखणे, कोणत्याही पक्षाचा पक्षपात न करता काम करणे ही त्यांची जबाबदारी असते.अशा अत्यंत महत्वाच्या पदावर खा.रजनीताई पाटील यांना काम करण्याची संधी काल मिळाली.या उच्च सिंहासनावर विराजमान झालेल्या रजनीताईंना पाहून प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!