ग्रामीण भागातील उन्हाळ्यात होत असलेली लोडशेडींग तात्काळ बंद करा,गाव अंधारात असल्याने नागरिकांना सहन करावा लागत आहे त्रास

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ग्रामीण भागातील लोडशेडींग तात्काळ बंद करावी.व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी केली जात आहे.अंधारामुळे ग्रामीण भागातील ५० टक्के लोक शेतात राहतात. त्यांना चोरांचा व गर्मीचा सामना करा लागत आहे त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लाईट रात्रभर गायब असते त्यामुळे महिलांना अंधाराचा सामना करावा लागतो.स्वयंपाक सुद्धा अंधारात करावा लागतो.
मुलांचे पेपर चालू आहेत त्यांनी अभ्यास कसा करायचा? हा प्रश्न पडला आहे तसेच चोरीच्या घटना सतत घडत आहेत त्यामुळे भर उन्हाळ्यात लोडशेडींग कशासाठी केली आहे असा प्रश्न गावोगावी नागरिकांना पडला आहे तरी प्रशासनाने तात्काळ लोडशेडींग बंद करून लाईट सुरूळीत करावी अशी मागणी सर्व केज तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा सबस्टेशनला कुलुप ठोकण्यात येईल व शेतकरी व नागरिकां कडून आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा प्रशासनाला दिला आहे. तरी प्रशासनाने तात्काळ विज पुरवठा सुरळीतपणे चालू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.



