युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा चि.समर्थ श्रीपाद बोरगावकर याची इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड.


केज/प्रतिनिधी
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत (केंद्र सरकार) इन्स्पायर अवार्ड मानक चा रिझल्ट २०२५-२६ जाहीर झाला असून,या स्कीम अंतर्गत नवसंशोधनासाठी शालेय विद्यार्थ्यांची नवोपक्रम व विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संशोधन व चिकित्सा करण्याच्या हेतूने हजारो नव बाल संशोधक तथा बाल वैज्ञानिकांची निवड करण्यात येते.
त्यातून महाराष्ट्र राज्यातून २३०३ बाल वैज्ञानिकांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड केली आहे.त्यात बीड जिल्ह्यातील २२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.त्यातून केज तालुक्यातून युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा चि.समर्थ श्रीपाद बोरगावकर इयत्ता सातवी याची इन्स्पायर अवॉर्ड बाल वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्था सचिव श्री.दीपक दादा घुमरे, संस्था अध्यक्ष श्री.यु.बी. सुकाळे,विद्यालयाचे प्राचार्यश्री.भोसले ए.यु, पर्यवेक्षक श्री.शेख एम. बी,उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री.चव्हाण एन.एन संस्थेचे श्री.घुमरे प्रदीप सर त्याला मार्गदर्शन करणारे श्री. खराडे सर,गडकर सर, भांडे सर,धायगुडे सर, मुकदम सर,तरकसबंद सर,शिक्षक, प्राध्यापक, पालक असंख्य नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



