सामाजिक

व्यापारी महासंघाच्या वतीने केज पोलीस स्टेशनला दिलेल्या वॉटर फिल्टरचे लोकार्पण, पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केली कृतज्ञता 

केज/प्रतिनिधी

आपल्या समाजोपयोगी उपक्रमांनी सतत क्रियाशील असलेल्या येथील व्यापारी महासंघाच्या वतीने केज पोलीस स्टेशनला वॉटर फिल्टर विथ कुलिंग सिस्टम भेट देण्यात आले होते त्याच्यालोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम काल दि.१२ मार्च वार गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडला

केज पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी व्यापारी संघाच्या वतीने केज पोलीस स्टेशनला वॉटर फिल्टर विथ कुलिंग सिस्टम देण्याची ईच्छा केज पोलीस स्टेशनचे इंचार्ज असलेले पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याकडे व्यक्त केली असता उनवणे यांनी सकारात्मकता दर्शवली होती.त्यानुसार केज पोलीस स्टेशनच्या आवारात फिल्टर व कुलिंग मशीन बसवण्यात आले व फीत कापुन व श्रीफळ फोडून त्याचे लोकार्पण देखील लागलीच करण्यात आले

व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये बसवण्यात आलेल्या वॉटर फिल्टर मुळे सर्वसामान्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यास मदत होणार असल्यामुळे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी व्यापारी बांधवांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

तर केजमधील व्यापारी बांधव नेहमीचसामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच करत आला असुन गरजेनुसार असेच उपक्रम भविष्यात राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहु अशी ग्वाही यावेळी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी प्रा. हनुमंत भोसले,विकास अप्पा मिरगणे,पांडुरंग मिटकरी,सुहास चिद्रवार, निरंजन लोकरे,भूषण भन्साळी,गोविंद कणसे, सुरेश थोरात,गोविंद जाजू,नितीन काळे, प्रकाश जाडकर,रणजित निंगुळे,आदित्य मिटकरी, मयूर मांडलीया यांच्या सह अनेक व्यापारी बांधव व पोलीस कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!