केज शहराच्या मुख्य महामार्गावर वाहनांची कोंडी ; बाह्य बाजू वळण रस्त्याची गरज

केज/प्रतिनिधी
केज शहराच्या मध्यवर्ती भागातून खामगाव – पंढरपूर व अहमदपूर अहिल्यानगर हे महामार्ग जातात.इतरत्र बाजारपेठ नसल्यामुळे शासकीय रुग्णालय,भवानी चौक, छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते शिक्षक कॉलनी या भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत गर्दी झालेली असते.
वाहनांची कोंडी होते.गर्दीमुळे यापूर्वी अनेक वेळा शहरात अपघात झाले आहेत. यामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमावा लागला आहे.महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी बाह्य बाजू रस्त्याची आवश्यकता आहे.बाह्य वळण रस्ता तयार झाल्यास वाहनांची कोंडी होणार नाही.रहदारीचा प्रश्न सुटेल.अपघातात जाणारे जीव वाचतील. तात्काळ बायपास तयार करावा अशी मागणी केली जात आहे.यादोन्ही मुख्य महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढत आहे.हे दोन्ही मार्ग शहरात नेहमीच गर्दीने वाहनांची कोंडी झालेले असतात.
पादचाऱ्यांना वाहनाने धडकून अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामुळे वाहतुकीसाठी अधिकचा वेळही लागतो आणि जीवित हानी होत आहे.बाह्य वळण रस्ता तयार झाल्यास कमी वेळेत अधिकचा प्रवास करणे प्रवाशांना शक्य होईल.नेहमी रस्ते जाम होण्याची समस्या सुटणे शक्य होईल .
लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा
खा.रजनीताई पाटील, खा.बजरंग सोनवणे, आमदार नमिता मुंदडा, नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, रमेशराव आडसकर यांनी पुढाकार घेऊन नेहमी वाहतुकीची कोंडी होत असलेला प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.
व्यवसायिकांची मागणी
केज शहरातील शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी यांना या गर्दीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.केज तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे.
ग्रामीण भागातून शेतकरी कामगार नोकरदार व्यावसायिक यांची शहरात नेहमीच गर्दी असते.पंचायत समिती, तहसील कार्यालय, शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन,न्यायालय अशी प्रशासकीय कार्यालये असल्याने त्या कामाने निमित्त येणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. व्यवसायिकांना तासनतास ताटकळत व्यवसाय बंद ठेवावे लागतात.मुख्य महामार्गा वरची वाहतूक बाह्य वळण मार्गाने वळवावी अशी मागणी केली जात आहे.



