दहा महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी युसुफ वडगाव पोलीसांच्या ताब्यात,आरोपीला पोलिस कोठडी

केज/प्रतिनिधी
दहा महिन्यापासून असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी पळसखेडा शिवारात जेरबंद करून गुरूवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाडेगाव शिवारात दि. २७ मे २०२५ रोजी दगडू उर्फ अण्णा ज्ञानेश्वर धपाटे, रा.भाटुंबा यांच्या खून प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील आरोपी आशिष बळीराम अंबाड रा.अंबाजोगाई हा मागील दहा महिन्यांपासून फरार होता.मागील दहा महिन्यांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे व त्यांचे पथक या आरोपी च्या मागावर होते.
बुधवार दि.४ मार्च रोजी या आरोपीबाबत गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यावरुन आरोपी आशिष बळीराम अंबाड यास पळसखेडा शिवारातून सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक छाया वाघमारे (कोमटवार),व पोलीस धनंजय कारले यांनी अटक केली.गुरूवार दि.५ मार्च रोजी आरोपी ला केज न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला दि.९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.दरम्यान मुख्य आरोपीला अटक केली असल्याने खुन का केला याचा तपास लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

