अध्यात्मिक

श्रीक्षेत्र पावनधाम संस्थानात भक्तिरसाची उधळण ; संत तुकाराम महाराज बीजनिमित्त सप्ताहात अकराव्या वंशजांचे कीर्तन

केज/प्रतिनिधी

श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजनिमित्त आयोजित सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शना खाली दररोज विविध महाराजांची कीर्तने, अभंग गायन व प्रवचने भक्तिभावाने पार पडत आहेत.सप्ताहातील कीर्तनमालेतील चौथेपुष्प म्हणून संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प.पुंडलिक महाराज देहुकर यांचे ओजस्वी कीर्तन संपन्न झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले की,श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान हे देहूकरांचे माहेरघर आहे. संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर अखंड सुरू राहणे हीच खरी सेवा आहे.

ते पुढे म्हणाले की ,संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून समाजाला भक्ती,सदाचार आणि समतेचा संदेश मिळतो. ही परंपरा जपणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोंचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.संत तुकोबाराय पावनधाम संस्थान हे कार्य अत्यंत निष्ठेने करत आहे,हे अत्यंत अभिमानास्पद आहे.या कीर्तनामुळे पावनधाम परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सप्ताह सोहळा भाविकां साठी आध्यात्मिक उर्जेचा अनमोल ठेवा ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!