सामाजिक

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत!

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संघटन बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी बीड विभाग आणि बीड मंडळ कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लातूर परिमंडळाचे अध्यक्ष आर.एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी केंद्रीय उपसरचिटणीस श्री.एन. डी.पोटभरे आणि लातूर परिमंडळ कोषाध्यक्ष श्री.विष्णु तेलंग साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.संघटनेच्या ध्येय धोरणांना तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोंचवण्यासाठी कार्यक्षम आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची फळी या कार्यकारिणीच्या माध्यमा तून उभी करण्यात आली आहे.नवनियुक्त बीड मंडळ कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.

अध्यक्ष-अविनाश सोनकांबळे,कार्याध्यक्ष प्रदिप वाघमोडे, सचिव शेख मुज्जमील, कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे,उपाध्यक्ष १)रमाकांत डिकले २) विशाल रामेश्वर गायकवाड ३) त्रिबंक रोडे ४) सय्यद रशीद ५) बादशह खान,सहसचिव १) विक्की वाघमारे २) अतुल सिताप,मुख्य संघटक १) नागेश हळगावकर २) सतेज सोनवणे,प्रसिद्धी प्रमुख महेश भोडंवे संघटनेचा विचार व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही नवनियुक्त टीम कटिबद्ध राहील,असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून,त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस आणि सामाजिक कार्या साठी मंगलकामना व्यक्त करण्यात येत आहेत. शिवाजी घुले केज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,लातूर परिमंडळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!