शैक्षणिक

एन.एम.एम.एस.परीक्षे मध्ये रामराव पाटील विद्यालयाचे घवघवीत यश

केज/प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस.परीक्षा मध्ये केज येथील रामराव पाटील शाळेने यशाची परंपरा कायम राखत ३३ पैकी १४ मुलांनी यश संपादन केले आहे. यामध्ये जाधव पंकज बब्रुवान या विद्यार्थ्यांनी १२८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटाकावलेला आहे,तसेच घाडगे उत्कर्ष याने १०४ गुण,महाजन आदित्य याने १००,गुण चाटे राजेंद्र यांनी ९६ गुण मिळवलेले आहेत या विद्यार्थ्यांना श्री.पोटभरे, श्री.देवकते, श्री.इर्शाद, श्री. कळेकर,श्री.गोरे,श्री. गायकवाड,श्री. नाईकनवरे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.खोसे व माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य पाटील, प्रशासकीय प्रताप मोरे यांनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व अध्यापकांचा यावेळी शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गोरे यांनी केले,तर सूत्रसंचालन श्रीमती गिरी यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!