शैक्षणिक

सावळेश्वर पैठण च्या शिवकन्यांचा जिल्ह्यात बोलबाला,जिल्हा परिषदेच्या शिवकन्यांच्या यशामुळे शाळा व तालुक्याचा मान उंचावला

केज/प्रतिनिधी

बीड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत केजतालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळेश्वर पैठण च्या शिवकन्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे.

लहान मुलींच्या गटातून सहभागी झालेल्या पैठण च्या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला.त्यांच्या सुसंवाद,तालबद्धता आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. सुनील केंद्रे,जेष्ठ शिक्षण विस्तारधिकारी दत्तात्रय चाटे,मुमताज पठाण मॅडम,पैठण केंद्राचे केंद्रप्रमुख अण्णासाहेब जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक गोविंदराव मुळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका अनिता शिंदे मॅडम,बालासाहेब पौळ, बालासाहेब लोखंडे आणि श्रीनिवास गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.पैठणच्या शिवकन्यांच्या या यशा मुळे शाळा व तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!