शैक्षणिक

राजर्षी शाहू विद्या मंदिर केज येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी

केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित,राजर्षी शाहू विद्या मंदिर या शाळेत नुकताच ‘स्वयंशासन दिन’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शाळेची धुरा सांभाळत प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.सर्व प्रथम राजर्षी शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांना वंदन करून शालेय कामकाजाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.बी.चाटे यांनी या उपक्रमाचे महत्त्व नमूद केले व म्हणाल्या की, “स्वयंशासन दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतात आणि त्यांना शिक्षकांच्या कार्याची जाणीव होते.”

स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची संपूर्णजबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.सकाळी परिपाठा पासून ते शाळा सुटेपर्यंत या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सहावी पर्यंत च्या वर्गांवर पूर्ण वेळ अध्यापनाचे कार्य केले. गणिताची सूत्रे असोत वा भाषेतील व्याकरण,या बालशिक्षकांनी अतिशय आत्मविश्वासाने आपले विषय मांडले.

या दिवसाचे विशेषआकर्षण म्हणजे शाळेच्या कामकाजाचे नियोजन. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.बी.चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राची सुरेंद्र शिंदे हिने विद्यार्थिनी मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला व पूर्ण वेळ कामकाज पाहिले.तिने संपूर्ण शाळेचे नियंत्रण,वर्गांचे वेळापत्रक आणि शिस्तीचे चोख पालन केले. या उपक्रमाला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी.यादव,ए.डी.देशमुख,आर.एस. क्षीरसागर,जि.बी.डिरंगे,जे.आर.मस्के,अनिता जाधव व ध्वजा गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापन कौशल्याचे कौतुक केले आणि त्यांना मोलाच्या सूचना दिल्या.

दिवसभराच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण होते.स्वतः शिकवताना मिळणारा आनंद आणि जबाबदारीची जाणीव यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!