जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी.

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांचीता.केज शाळेत दि.२० फेब्रुवारी २०२६ शुक्रवार रोजी मराठी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दि.२० फेब्रुवारी १८१२ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला.वडील गंगाधर शास्त्री होते.ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार,शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी “दर्पण” हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.त्यानिमित्ताने ६ जानेवारी हा पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मोलाचे कार्य केले.त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे पहिले मासिक सुरू केले.त्यांना आद्य समाजसुधारक मानले जाते.असे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित विज्ञानचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री. आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजलीगोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद,पिएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार, अनिता पवार,विद्यार्थी,विद्यार्थिंनी,शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडी ताई,मदतनिस हे उपस्थित होते.



