जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

केज/प्रतिनिधी
दि.१९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत हिंदवीस्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थीनी वैभवी दत्तात्रय घाडगे यांनी केले.याबाबत सर्व मार्गदर्शन श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या शाळेतील ९० विद्यार्थी विद्यार्थिंनींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती धर्माच्या लोकांना या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीस सामावुन घेतले.या विचारांचा आपण आपल्या जीवनात आदर्श घेतला पाहिजे असे श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित विज्ञानाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री. आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. या जयंती निमित्त या शाळेतील शिक्षक शिक्षिका वृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सादर केले.
याबाबत विशेष मार्गदर्शन आदर्श शिक्षक श्री.आकाश दत्तात्रयलोंढे सर यांनी केले.यावेळी ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,सेवा सहकारी सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हाइस चेअरमन,सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला, शिवप्रेमी व शिक्षणप्रेमी नागरिक,गावातील तरुण शिवप्रेमी व शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडीताई ,शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी शिवप्रेमींनी उत्कृष्ट साउंड सिस्टम व्यवस्था केली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. विद्यार्थिंनिंनी उत्कृष्ट रांगोळी काढून रांगोळी प्रदर्शन केले.शेवटी श्री. राहुल बजरंग बचुटे सर यांनी आभार मानले.


