आनंदगाव येथील स्वानंद सार्वजनिक वाचनालयात शिवजन्मोत्सव विविध सांस्कृतिक व क्रिडास्पर्धा कार्यक्रमाने संपन्न

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजानिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिव जन्मोत्सव ग्रंथप्रदर्शन, रंगभरण स्पर्धा,कथा कथन,काव्यवाचन, गीतगायन,उत्स्फुर्त भाषण,व्याख्यान इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबरच थैलीरेस,दोरी वरच्या उडया मुली व मुले दोन गटात,बेडूक उड्या,धावणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते,प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९-०० वाजता माजी सरपंच रामराजे गायकवाड,एस. के.वैरागे,बबन गायकवाड, संजय सोनवणे, रावसाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन नाना गायकवाड, पद्मसिंह गायकवाड यांची थोडक्यात व्याखाने झाली.रंगभरण स्पर्धेचे तज्ञ परिक्षक म्हणून छगननाना गायकवाड, रविंद्र गायकवाड पेंटर यांनी काम पाहिले. त्यानंतर कथाकथन स्पधf घेण्यात आली. त्यानंतर काव्यवाचन स्पर्धा घेणात आली. त्यानंतर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली.त्यानंतर उत्स्फुर्त भाषण घेण्यात आले.या सर्व स्पर्धा वाचनालयात घेण्यात आल्या.तर थालीरेस, दोरीवरच्या उडया मुली, मुले,बेडूक उडया,धावणे इत्यादी स्पर्धा शाळेच्या बंदिस्त मैदानावर घेण्यात आल्या.या सर्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून बाळासाहेब गायकवाड यांनी काम पाहिले.
रंगभरण स्पर्धा: प्रथम – सोहम गायकवाड,द्वितीय – शशीकांत गायकवाड, तृतीय-शिवम गायकवाड, उत्तेजनार्थ-पृथीराज घोगले, कथाकथन स्पर्धा प्रथम – यशवंत सौदागर, द्वितीय -अक्षरा सौदागर, तृतीय बालाजी टिंगरे काव्यवाचन स्पर्धा प्रथम -अक्षरा सौदागर, द्वितीय सार्थक घोगले, तृतीय -यशवंत सौदागर गीतगायन स्पर्धा प्रथम- अजिंक्य तट, द्वितीय – यशवंत सौदागर,तृतीय – सुशांत सौदागर,उत्स्फुर्त भाषण स्पर्धा प्रथम – आनंद गायकवाड, द्वितीय – सार्थक घोगले,तृतीय – अक्षरा सौदागर सांस्कृतिक स्पर्धेत या प्रमाणे स्पर्धकांची प्रथम, द्वितीय,तृतीय निवड करण्यात आली.
तर कीडा स्पर्धेत थैली रेस प्रथम – यशवंत सौदागर, द्वितीय – दिव्या साबळे, तृतीय – बालाजी टिंगरे दोरीवरच्या उडया मुलींचा गटात प्रथी – वेदिका गायकवाड,द्वितीय – दिव्या साबळे,तृतीय – अनुजा घोगले तर मुले गटात प्रथम – विक्रम गायकवाड,द्वितीय – आनंद गायकवाड,तृतीय – शिवतेज गायकवाड बेडूक उडया स्पर्धा प्रथम – यशवंत सौदागर, द्वितीय – सुशांत सौदागर, तृतीय – अनुष्का भोगजकर,धावणे स्पर्धेत प्रथम शिवतेज गायकवाड,द्वितीय – अनुष्का भोगीकर,तृतीय – शिवरा भोगजकर यांची प्रथम,द्वितीय तृतीय विजेते म्हणून निवड करण्यात आली.
समारोप व बक्षिस वितरण ५-०० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,परिक्षक छगननाना गायकवाड, रविंद्र गायकवाड पेंटर, बिराबापू सौदागर यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देवून करण्यात आले.सकाळी ९ ते ५ पर्यंत ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान,रंगभरण, कथाकथन, काव्यवाचन, गीतगायन,उत्स्फुर्त भाषण,थैलीरेस,दोरी वरच्या उडया,बेडूक उडया,धावणे इत्यादी सांस्कृतिक व क्रिडा विषयक स्पर्धेचा व शिवजन्मोत्सवाचा अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करावी असे आवाहन व प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केल.सर्व कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थीनी,वाचक,युवक, जेष्ठ नागरीक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.



