सामाजिकसांस्कृतीक

केकतसारणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे रमेशराव आडसकर यांच्या हस्ते अनावरण, पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील केकत सारणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी युवा नेते ऋषिकेश आडसकर, जीजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राधाताई सपकाळ,सरपंच अनिता काळे,पंडितराव सावंत यांच्या सह गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

यावर्षी शिव जयंती अत्यंत पारंपारिक व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत कोणत्याही प्रकारचा कर्कश आवाज करणारा डॉल्बी न लावता ढोल- ताशे, लेझीम, टिपरे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला.

सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजा रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सजवलेल्या बैलगाडीतून महाराजांची प्रतिमा ठेवून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पोशाख परिधान केलेले युवक, लेझीम खेळणाऱ्या महिला व मुली,तसेच शिवकालीन वेशभूषेत सहभागी झालेले लहान मुले हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. जय भवानी,जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

आपल्या भाषणात रमेश आडसकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा उल्लेख करून युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.सामाजिक ऐक्य, शिस्त आणि  पर्यावरण पूरक सण साजरा करण्याचा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमात गावातील सर्व लहान मुले, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तरुणांनी नियोजन, शिस्त व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.विशेष म्हणजे, ध्वनीप्रदूषण टाळत पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा घेतलेला निर्णय सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

संपूर्ण गावाने एकजुटीने आणि उत्साहाने जयंती साजरी करून समाजा पुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. केकतसारणी येथील ग्रामस्थांनी परंपरा जपत सुसंस्कृत आणिपर्यावरण पूरक पद्धतीने जयंती साजरी करून खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांना अभिवादन केले.यावेळी लहू फुके,विशाल काळे,प्रमोद काळे,बाळू काळे,अण्णा कारंडे, बाळासाहेब सपकाळ, महादेव सपकाळ, रामदास सपकाळ, वैभव सपकाळ,बाळासाहेब गोंडे,महादेव गिराम, प्रदीप धावडे,माधव काळे,दत्ता काळे,स्वप्नील ताटे, सुभाष गायकवाड, शरद गिराम,बालासाहेब सपकाळ,बापुराव फुके, चंद्रकांत कोरडे,यांच्या सह गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!