क्रिडाशैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी चौरे ज्ञानेश्वरी माणीक हिला साॅप्टबाॅल खेळात कांस्यपदक

केज/प्रतिनिधी

बिलासपुर छत्तीसगड येथे दि.३ ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.चौरे ज्ञानेश्वरी हिला कांस्य पदक मिळाले तसेच महाराष्ट्राच्या संघालाही कांस्यपदक प्राप्त झाले कांस्यपदक प्राप्त विद्यार्थिनी चौरे ज्ञानेश्वरी माणीक हिचा सत्कार बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अॕड. उद्धवराव कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संकुलाच्या प्राचार्य डॉ.कविता गित्ते कराड मॅडम व संस्थेचे उपाध्यक्ष राजेश कापसे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!