धार्मिक

मोहम्मद आहिल काजी यांने पहिला रोजा पूर्ण केला

केज/प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्त्व असुन या महिन्यात मुस्लिम समाजातील बहुतांश महिला पुरुष सात वर्षापुढील महिला व पुरुष यांना या महिन्यात उपवास (रोजा) हा ठेवण्यासाठी आवश्यक समजला जातो.या पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा,संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे.केज येथील साडे सहा वर्षांच्या मोहम्मद आहिल नदिम काजी यांने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून काजी व शेख कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे.लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासतात.

मोहम्मद आहिल काजी यांने पहाटेच्या सहेरी पासून संध्याकाळच्या इफ्तार पर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न करता त्यांने हा रोजा पूर्ण केला.त्याच्या जिद्दीचे आणि श्रद्धेचे परिसरात, मित्र परिवारात कौतुक होत आहे.कुटुंबियानी सांगितले की,मोहम्मद आहिल ने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्याच्या उत्साहामुळे आणि चिकाटीमुळे आम्हाला ही आनंद व अभिमान वाटतो. रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी यासाठी मोहम्मद आहिलचा हा पहिला रोजा प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!