सामाजिकसांस्कृतीक

उंदरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण 

केज/प्रतिनिधी

उंदरी येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुला-मुलींसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची राजनीति,युद्धनीती, स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण तसेच शिवरायांची आदर्श वागणूक यावर प्रभावी विचार मांडले.

उपस्थितांनी चिमुकल्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाला भरभरून दाद दिली.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ मुला-मुलींना रोख रक्कम,शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी छावाचे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,डॉक्टर बिभीषण ठोंबरे,सुदाम दादा ठोंबरे, नाना ठोंबरे,दीपक सोनवणे,लक्ष्मीकांत ठोंबरे,नाना जाधव, विलास कुरवडे, धनंजय ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उंदरी येथे शिवजयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!