शैक्षणिक

वसंत प्राथमिक शाळा, केज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे पालक,प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक

केज/प्रतिनिधी

दि.२६ जानेवारी २०२६ वसंत प्राथमिक शाळा, केज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सकाळीच शाळेच्या आवारात तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.

मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रगानाच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेले संविधानाची ओळख आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर भाषणे दिली.छोट्या मुलांनी देशभक्तीपूर्ण गीते गायली,विद्यार्थ्यांनी भारत माता की जय,वंदेमातरम, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देत उत्साह वाढवला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी दरम्यान सादर केलेल्या कार्यक्रमात देशभक्तीपर नृत्य,टिपरी नृत्य,लेझीम, समूह नृत्य,वैयक्तिक नृत्य आणि एकत्रित गायन यांचा समावेश होता. सकाळी ध्वजारोहणानंतर

भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर छोटी चर्चा सत्रही घेण्यात आले. मुख्याध्यापक श्री.प्रशांत देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या लोकशाही मूल्यांचा,एकतेचा आणि संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे.

शाळेतील मुलांनी आज दाखवलेला उत्साह पाहून अभिमान वाटतो.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यां मध्ये देशप्रेम,नैतिक मूल्ये, आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढते.शिक्षकांनी मुलांना देशभक्तीची शपथ दिली, वसंत प्रा.शाळेची प्रभात फेरी शहरातील वकील वाडी,प्रशांत नगर,समर्थ नगर,अहील्यादेवी नगर, फुले नगर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी रोड या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले कला कौशल्य दाखवले उपस्थित पालक प्रेक्षकांनी मुलांच्या उत्साहाचे व कलागुणांचे कौतुक केले.तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने शाळेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

वसंत प्राथमिक शाळेतील हा उत्सव यशस्वीपणे साजरा झाल्याने परिसरातील इतर शाळांसाठीही आदर्श ठरला आहे.वसंत प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम व प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख,सह शिक्षक किरण असवले,प्रविण देशमुख,विजय आरकडे, अंगणवाडी सेविका सौ. अंजली हजारे मॅडम,सौ. दिव्या बनसोडे मॅडम तसेच पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!