
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मधुमेहतज्ञ डॉ. अतुल शिंदे यांना डायबेटिज इंडिया या राष्ट्रीय संस्थेचा डायबेटिज अवेअरनेस इनिशिएटिव्ह अवॉर्ड २०२६ जाहीर झाला आहे.गेल्या १३ वर्षांपासून योगेश्वरी डायबेटिज केअर सेंटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही राष्ट्रीय दखल आहे.
डॉ.शिंदे यांनी १३ वर्षांत मोफत शिबिरांच्या माध्यमातून सुमारे २२ हजार रुग्णांची तपासणी आणि उपचार केले आहेत दरवर्षी ते १५०० ते २००० रुग्णांसाठी मोफत निदान शिबिरे आयोजित करतात.संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या पुरस्कारा साठी केवळ दोन डॉक्टरांची निवडकरण्यात आली असून,उर्वरित महाराष्ट्रातून डॉ.शिंदे हे एकमेव मानकरी ठरले आहेत.मधुमेह आजारा बद्दल तळागाळात जन जागृती आणि रुग्णसेवेचा त्यांचा हा पॅटर्न मराठवाड्यात आदर्श मानला जातो.हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या शुक्रवारी,दि.१३ फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथे संपन्न होणार आहे.या यशाबद्दल अंबाजोगाई परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



