शासनाने प्रवर्गनिहाय जनगणना करावी – प्रा.बबनराव आंधळे

बीड / प्रतिनिधी
सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणे एससी, एसटी,इतर मागासवर्गीय, ओबीसी,विमुक्त जाती, भटक्या व अर्ध भटक्या जमातीसाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून प्रवर्गनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
भारत सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर केलेल्या जनगणना योजनेनुसार दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये जातीनिहाय जनगणना प्रस्तावित आहे मात्र पहिल्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेल्या घरांच्या यादीच्या प्रश्नावलीत केवळ एससी, एसटी,व इतर असेच पर्याय देण्यात आले असून ओबीसी विमुक्त जाती,(डी एन टी) व भटक्या जमातीसाठी स्वतंत्र श्रेणीचा अभाव आहे यामुळे ओबीसी विमुक्त भटक्यावर अर्ध भटक्या जमातीची अचूक गणना होईल की नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे.
याचा परिणाम जातीनिहाय जनगणणेवर होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे जनगणनेच्या घर यादी करण व लोकसंख्या गणना या दोन्ही टप्प्यात एससी,एसटी प्रमाणे ओबीसी,विमुक्त भटक्या, व अर्ध भटक्या,जमाती साठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात यावा तसेच कुटुंब प्रमुखांच्या श्रेणी मध्ये ओबीसी डी एन टी हे पर्याय समाविष्ट करावेत व्यक्तीच्या जात उपजाती सह विमुक्त भटक्या व अर्ध भटक्या जमातीची स्थिती स्वतंत्रपणे नोंदवावी तसेच केंद्र व राज्याच्या ओबीसी व डी एन टी याद्या एकत्र करून डुप्लिकेशन मुक्त कोड निर्देशिका तयार करून त्यानुसार जनगणना करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्रा.बबनराव आंधळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.



