चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास भेट

केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट दिली.या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यां मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच नवकल्पनांची ओळख करून देणे हा होता.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली शास्त्रीय मॉडेल्स,प्रयोग व प्रकल्प मांडण्यात आले होते.ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलव्यवस्थापन, आरोग्य व तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्पांनी विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रकल्प उत्सुकतेने पाहिले व संबंधित विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकल्पाचे शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून विज्ञान विषयाबद्दलची गोडी वाढण्यास मदत झाली आहे.या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षक तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.



