शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या आरोग्या साठी जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहाची दररोज साफसफाई बंधनकारक – प्रा.बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील स्वच्छतागृहाची अवस्था वाईट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दररोज स्वच्छता झाली पाहिजे परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवक पदाला मंजुरी नाही मग ही कामे कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेमध्ये स्वतंत्र स्वच्छता कर्मचारीनियुक्त नसल्याने अनेक ठिकाणी स्वच्छता गृहाची साफसफाई होत नसल्याचे आढळून आले आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण युवक संघटनेने ही मागणी केल्यानंतर तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारा मार्फत दररोज शाळेतील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच संबंधित ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत सूचित करून कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांचेआरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल असा विश्वास ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!