क्रिडा

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक  

केज/प्रतिनिधी

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालयाचा विद्यार्थी चि.आदित्य अरविंद विद्यागर याची १९ वर्ष महाराष्ट्र राज्य शालेय सॉफ्टबॉल संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली होती.१९ वर्ष ६९ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्ट बॉल स्पर्धा नागपूर येथे दि.,३० जानेवारी २०२६ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघास सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी चि.आदित्य विद्यागर याचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बीड येथे संपन्न झाला.

आदित्यचा सत्कार करताना,बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर साहेब, बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड सर,श्री. ढाकणे सर,काळे सर, होसुरकर सर,पाटील सर, रेवन्नाथ शेलार सर,करंडे सर,जाहेर सर,बाळू सर तसेच प्राचार्य डॉक्टर कविता कराड गित्ते उपस्थित होते.आदित्यला सानप सर,शेलार सर, राठोड सर,तरकसे सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.सर्वांनी सत्कार करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!