गुन्हेगारी

केज तालुक्यातील दोघे जण तामिळनाडू पोलीसांच्या जाळ्यात, बनावट नोटा प्रकरणी दोन जण पकडले 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील एक दुकानदार व्यापारी आणि तालुक्यातील डोका गावचे माजी सरपंच रमेश भांगे या दोघांना तामिळनाडू पोलिसांनी ८ लाख ३७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात थुवकुडी पोलिसांनी दि. २१ जानेवारी रोजी ही कारवाई केली.केज तालुक्यातील डोका गावचे माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे वय ५४ वर्ष आणि केज शहरातील व्यापारी नारायण राम वय ३४ वर्ष हे दोघे कार क्रमांक एम.एच.४४ झेड २३८३ या गाडीने हे तामिळनाडू राज्यात गेले होते.

दि.२१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्लीतील थुवकुडी येथील पेट्रोल पंपावर इंधन भरताना बनावट नोट दिली होती. त्यावेळी ती बनावट नोट असल्याचे त्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांने पोलीसांना कळवल्यानंतर पोलिसांनी चेकपोस्ट कारची झडती घेतली.यात २०० रुपयांच्या नोटांची ४१ बंडले आढळून आली. सदरील दोन्हीही आरोपींना त्यांच्या चार चाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे.या दोघांनी बनावट कुठे वापरल्या याचा तामिळनाडू पोलीस तपास करत आहे.केज मधील दोघांना बनावट नोटासह तामिळनाडूच्या पोलीसांनी पकडल्याने केज शहरासह तालुक्या मध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!