वैकुंठवासी रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वरपगाव येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह,दि. ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन, शिव महापुराण कथा व दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
श्री क्षेत्र साधु शिवराम पुरी मठ संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत नागेशपुरीजी महाराज वरपगावकर यांच्या पावन स्मृतीने पवित्र झालेल्या वरपगावच्या भूमीमध्ये वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरपगावकर यांच्या विसाव्या पुण्य स्मरणानिमित्त दिनांक ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये वरपगाव तालुका केज येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिव महा पुराण कथा व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा व विविध सुप्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तनाचे आयोजन केलेले असून याचा अलभ्य लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी अनेक नामंवत सुश्राव्य कीर्तना मध्ये ३१ जानेवारी रोजी व्याकरणाचार्य ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.माधव महाराज ढाकणे आळंदी देवाची यांचे कीर्तन होईल दिनांक १ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.महंत श्रीराम महाराज विडेकर,दिनांक २ फेब्रुवारी रोजी ह.भ.प मताधिपती लक्ष्मण महाराज मेगडे नेकनूर यांचे किर्तन होईल तसेच दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भागवताचार्य,रामायण आचार्य ह.भ. प. भागवत महाराज बादाडे तर दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बारामतीचे ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन होईल.
दिनांक ५ फेब्रुवारी रोजी आळंदी देवाची येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज क्षिरसागर यांचे किर्तन होईल तर ६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.ज्ञानसिंधू संदिपान महाराज हासेगावकर किर्तन होईल तर काल्याचे किर्तन दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मठाधिपती मठ संस्थान वरपगाव महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल.वरील प्रसिद्ध कीर्तनकार यांचा मेळा या ठिकाणी भरणार असून किर्तन संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होतील.तसेच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. व्याकरणाचार्य तुकाराम महाराज शास्त्री लिंबगाव ता. माजलगाव यांच्या शिव महापुराण कथा त्यांच्या सुमधुर वाणीतून दररोज शिव महापुराण कथेचे दोन ते चार वेळेत कथा करण्यात येईल.सप्ताहाचे हे विशेष आकर्षण म्हणता येईल.
दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटेचार ते सहा काकडा भजन,सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम,सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण,बारा ते एक भोजन व विश्रांती, दोन तेचार शिवमहापुराण कथा,पाच ते सहा हरिपाठ सात ते नऊ हरिकीर्तन अशा प्रकारे नियोजन केलेले आहे.त्याचप्रमाणे इतरही विविधकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.प्रतिवर्षी प्रमाणे या कार्यक्रमात केज तालुक्यातील वरपगावच्या पंचक्रोशी तील शेकडो गावाच्या भाविक भक्तांचा सागर या ठिकाणी पहावयास मिळत असतो.
वै.नागेश पुरी महाराज वरपगाव कर,वै.रामकृष्ण महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे वरपगाव मठाचे मठाधिपती ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर व वरपगाव ग्रामस्थ यांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी ठिक सात वाजता किर्तन सेवा सुरू होणार आहे यांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. दररोज गावकऱ्यांनी आप आपल्या पंगती घेतल्या असुनअमृततुल्य काल्याचे किर्तन झाल्यावर महाप्रसाद होईल असेही गावकऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.



