सामाजिक

आज केज शहरात सर्व पक्षीय व विविध संघटना यांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

केज/प्रतिनिधी

केज शहर व केज तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व संघटनांचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,तालुक्यातील सर्व पत्रकार आणि सर्व युवक युवती व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.यामध्ये असे कळविण्यात येते की, बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,अजित दादांचे खाजगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, विमान चालक कॅप्टन सुमित कपूर,कॅप्टन शांभवी पाठक आणि हवाईसुंदरी (फ्लाईट अटेंडंट) पिंकी माळी या सर्वांचे दुर्दैवी निधन झाले.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वरील सर्वांना केजवासियांची आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार दि.३० जानेवारी २०२६ रोजी ठीक साडे चार वाजता पंचायत समिती केज सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे .तरी सर्वांना विनंती की,आपण वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केज येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!