शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी                

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज याशाळेत दि.२३जानेवारी २०२६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले व पराक्रम दिन साजरा करण्यात आला.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दि.२३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला.वडील जानकीनाथ व आई प्रभावतीदेवी होत्या.त्यांचे वडील वकिल होते.

ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते.त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा या घोषणेने भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची ठिणगी टाकली.ब्रिटिश सरकारलाशह देण्यासाठी त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज उभी केली.त्यांचे निर्भिड नेतृत्व आणि अढळ देशभक्ती आजही भारतीयांनाप्रेरणा देते.दि.२३ जानेवारी रोजी भारत सरकार पराक्रम दिन साजरा करते.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.

या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर व गणित विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर तसेचश्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी सविस्तर माहिती दिली.श्री.राहुल बजरंग बचुटे सर, आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार,अनिता पवार,विद्यार्थी,विद्यार्थिंनी, शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडीताई,मदतनिस, ट्रेनी शिक्षिका हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री.राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!