लक्ष्मी मुंडे नर्सिंगसाठी व स्कूलसाठी आम्ही मदत करु — अक्षय भैय्या मुंदडा लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कुलचे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेह सम्मेलन शुक्रवारी रोजी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे वार्षिक स्नेहसमेंलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सांस्कृतीक कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीनी आपल्या कलेतून उपस्थित मान्यवरांची मने जिंकल्याने नर्सिंगच्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले.केज शहरा पासुन जवळच असलेल्या लक्ष्मी नर्सिंग स्कुलचे २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसम्मेलन शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी दोन सत्रात संपन्न झाले. सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्नेहसमेंलनाचे उद्घाटन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,जनविकासचे अध्यक्ष हारुणभाई इनामदार,केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दत्तात्रय केंद्रे,डाॅ.योगीनी जायभाये मॅडम,लॅबचे नागरगोजे, विठ्ठल जाधवर,दिनकर चाटे या सर्व पाहुणे मंडळीचे स्वागत करण्यात आले.या सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावळी नर्सिंगच्या सर्वविद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची शपथ घेतली.दुस-या सत्रात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत बापू हे होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केज कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती श्री. अंकुशराव इंगळे,महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रवक्ते श्री.रामभाऊ कुलकर्णी, अॕड.शरद इंगळे, ऊसतोड मजूर संघटनेंचे अध्यक्ष कृष्णा तिडके, सेवानिवृत्त मुख्याद्यापक विठ्ठलराव जाधवर,भाजपाचे दिनकर चाटे, संस्थेंच्या सचिव सौ. उषाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक देवगांव सेवा सोसायटीचे चेअरमन मधुर भैय्या मुंडे यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अक्षय मुंदडा म्हणाले की, रमाकांत बापूनी आता पर्यंत राजकीय क्षेत्रासह पेट्रोल पंप,क्रेशरसह शेती मध्ये प्रगती केल्याने ते यशस्वी झाले.
आता शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घेऊन लक्ष्मी नर्सिंग स्कूल सुरु केल्याबद्दल मी बांपूचे अभिनंदन करतो.यापूढे मधुरने देखील या शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष दिले पाहीजे,या नर्सिंग स्कूलमुळे केज तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगती होणार त्यासाठी सर्वनर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन प्रॅक्टीस करावी.पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहीजे.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीच सोन केले पाहीजे.आपल्या शैक्षणिक संस्थेला शिस्त लावली पाहीजे त्यामुळे शिक्षणाची प्रगती होते.
लक्ष्मी नर्सिंगसाठी व स्कूलसाठी आम्ही लागेल ती मदत करण्यासाठी कटीबध्द आहोत.असे अक्षयभैय्या मुंदडा यावेळी म्हणाले.यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कला सादर करताना ऑखे खुली हो य बंद प्यार कैसा होता है, ढफलीवाले ,तेरी ऑखीयो का काजल,लिखे खत तुझे,बांगो बांगो,ह्रदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे,राणी माझ्या मळ्या मध्ये घुसशिल का,चंद्रा, गोरेगोरे मुखडे पे काला काला चष्मा,मला म्हणत्यात हो पूण्याची मैना,बैलजोडा पाटलांचा बैलगाडा, शांताबाय, डाॅल्बी बोलवा डिजेला,गुलाबी साडी,ग साजणे आली ठुमकत हिरव्या राणी, आस वाजवा की,झाल झाल झिंगाट,पाखरा आझाद केल तुला,मिरची झापूक झूपूक वाजत राहतय गं,पिचली माझी बांगडी गं, तुमचा कट्टर मी मावळा,वाजले की बारा, कोंबडी पळाली असे मराठी हिंदी गितावर नृत्य करुन विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीनी आपल्या कलेतून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
यामुळे नर्सिंगच्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांनीकौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रवि पवार,लखेरा सर,गायके मॅडम, गालफाडे मॅडम, सोनवणे ताई यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार संस्थेंच्या सचिव सौ.उषाताई मुंडे यांनी मानले.



